Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Sri Kashi Jagadguruji Ashirvachan

Sri Kashi Jagadguruji Ashirvachan

श्रीमत्काशीविश्वाराध्यज्ञानसिंहानाधीश्वर
श्री १००८ जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी
जंगमवाडी मठ, श्रीक्षेत्र काशी (वाराणसी) यांचे
शुभाशीर्वचन


‘श्रीसिद्घान्तशिखामणितत्त्वामृत’ हा मराठी ओवीबद्घ पारायणग्रंथ काशीपीठाच्या शैवभारती शोधप्रतिष्ठानच्या शोधप्रकाशन ग्रंथमालेचे ६३ वे पुष्प म्हणून प्रकाशित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ‘श्रीसिद्घान्तशिखामणी’ हा वीरशैवांचा अत्यंत प्राचीन व प्रामाणिक असा धर्मग्रंथ आहे. वेदागमपारंगत योगिकुलचक‘वर्ती श्रीशिवयोगी शिवाचार्यांनी रेणुक-अगस्त्य यांच्या संवादरूपाने संस्कृत भाषेत या ग्रंथाची रचना केली आहे. हा अपूर्व आणि अद्वितीय असा ग्रंथ महाराष्ट्रातील भाविक भक्तांना सुबोध व्हावा यासाठी मराठी वीरशैव साहित्याचे अभ्यासक-संशोधक, चिंतक व कवी डॉ० शे० दे० पसारकर यांनी या ग्रंथावर ‘श्रीसिद्घान्तशिखामणितत्त्वामृत’ या नावाने ओवीबद्घ भाष्य लिहिले आहे.
शे० दे० पसारकर यांनी पुणे येथे जगद्गुरू विश्वाराध्य विद्यार्थि-निलयात राहून पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला आणि मराठी विषयात एम्०ए०…

Read more: Sri Kashi Jagadguruji Ashirvachan

Sri Rambhapuri Jagadguruji Ashirvachana

Sri Rambhapuri Jagadguruji Ashirvachana

श्रीमद् रंभापुरी वीरसिंहासनाधीश्वर
श्री १००८ जगद्गुरू प्रसन्नरेणुक वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी
वीरसिंहासन महापीठ, बाळेहोन्नूर, जि० चिक्कमगळूर (कर्नाटक) यांचे
शुभाशीर्वचन


श्रीकाशीजगद्गुरू डॉ० चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी ‘श्रीसिद्घान्तशिखामणी’ हा पारायणग‘ंथ प्रथमत: कन्नड भाषेत तयार करून कर्नाटकात प्रसिद्घ केला होता. त्यावेळी आम्ही त्या ग‘ंथाला आपला शुभसंदेश दिला होता. आता श्रीकाशीमहास्वामीजींच्या आग‘हपूर्वक आदेशावरून सोलापूरचे मराठीचे प्राध्यापक डॉ० शे० दे० पसारकर यांनी वीरशैवधर्मग‘ंथ ‘श्रीसिद्घान्तशिखामणी’वर मराठी ओवीबद्घ भाष्य लिहून महाराष्ट्रातील सर्व सद्भक्तांना पारायणग‘ंथ तयार करून दिल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद वाटत आहे. महाराष्ट्रामध्ये धर्मग‘ंथ आणि संतचरित्रांवरील ओवीग‘ंथांचे पारायण करण्याची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील वीरशैव मठाधिपती शिवाचार्य आणि समस्त सद्भक्तगण संतशिरोमणी मन्मथस्वामीकृत ‘परमरहस्य’ ग‘ंथाचे पारायण करीत होते. आता त्याचबरोबर त्यांनी धर्मग‘ंथ ‘श्रीसिद्घान्तशिखामणितत्त्वामृत’ ग‘ंथाचे सुद्घा पारायण करावे. त्या ग‘ंथात सांगितल्याप्रमाणे…

Read more: Sri Rambhapuri Jagadguruji Ashirvachana

Sri Ujjaini Jagadguruji Ashirvachana

Sri Ujjaini Jagadguruji Ashirvachana

श्रीमद् उज्जयिनी सद्घर्मसिंहासनाधीश्वर
श्री १००८ जगद्गुरू सिद्घलिंगराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी  
सद्घर्मसिंहासन महापीठ, उज्जयिनी, जि० बळ्ळारी (कर्नाटक) यांचे
शुभाशीर्वचन


शिवाच्या मुखारविंदातून निघालेले २८ शिवागमांचे संपूर्ण सार म्हणजेच ‘श्रीसिद्घान्तशिखामणी’ होय. शिवाचा उपदेशच श्रीजगद्गुरू रेणुकाचार्यांनी अगस्त्यऋषींना उपदेशिला. म्हणून हा ग‘ंथ शिवाचा कृपाप्रसादच होय. मूळ संस्कृतामधील हा ग‘ंथ ‘श्रीसिद्घान्तशिखामणितत्त्वामृत’ या नावाने पसारकर यांनी मराठीत ओवीबद्घ केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना पारायण करण्यासाठी अत्यंत सोपे झाले आहे.                      डॉ० पसारकरांनी काशीपीठात दोन महिने सपत्निक वास्तव्य करून ३८११ ओव्यांची रचना केली. तो खरोखरच ज० विश्वाराध्यांचा मंगलाशीर्वादच होय. संस्कृतमधील हा ग‘ंथ आता पूर्णपणे मराठी ओवीछंदात आल्यामुळे या ग‘ंथाचे पारायण आणि स्वाध्याय करणे मराठी भक्तांना अत्यंत सुलभ झाले आहे. अत्यल्प वेळामध्ये एवढ्या ओव्या लिहून ग‘ंथ सिद्घ करणार्‍या पसारकरांची साहित्यरचनाशैली खरोखर आश्चर्यजनक आहे.…

Read more: Sri Ujjaini Jagadguruji Ashirvachana

Sri Shreeshaila Jagadguruji Ashirvachana

Sri Shreeshaila Jagadguruji Ashirvachana

श्रीशैलसूर्यसिंहासनाधीश्वर
श्री १००८ जगद्गुरू डॉ० चन्नसिद्घराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी
श्रीशैलसिंहासन महापीठ, श्रीक्षेत्र श्रीशैल, जि. कर्नूल (आंध्रप्रदेश) यांचे
शुभाशीर्वचन

 
सोलापूरचे मराठी वीरशैव साहित्याचे थोर अभ्यासक, समीक्षक, लेखक व कवी डॉ. शे. दे. पसारकर यांनी श्रीकाशीजगद्गुरू महास्वामीजींच्या आदेशावरून ‘श्रीसिद्घान्तशिखामणी’वर मराठी ओवीबद्घ भाष्य केल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद वाटत आहे. आपल्या देशामध्ये ‘श्रीमद्भगवद्गीता’ आणि ‘श्रीसिद्घान्तशिखामणी’ हे दोन्ही ग्रंथ योगशास्त्र प्रतिपादन करणारे अमूल्य ग्रंथ आहेत. भगवद्गीता उपनिषदांचे सार आहे तर श्रीसिद्घान्तशिखामणी कामिकादिवातुलान्त अठ्ठावीस शिवागमांचे सार आहे. भगवद्गीतेप्रमाणे श्रीसिद्घान्तशिखामणीसुद्घा एक विश्वव्यापी योगप्रतिपादक ग्रंथ आहे. श्रीकाशीजगद्गुरू महास्वामीजींनी स्वत: या ग्रंथाचा कन्नड अनुवाद करून प्रथमत: पारायणग्रंथ सिद्घ केला. त्यानंतर त्यांनी विविध भाषक विद्वानांकडून हिंदी, तेलुगू, तमिळ, मलयालम, इंग्लिश आणि रशियन भाषेत सुद्घा हा पारायणग्रंथ तयार करून त्या त्या प्रांतामध्ये व…

Read more: Sri Shreeshaila Jagadguruji Ashirvachana