Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Sri Kashi Jagadguruji Ashirvachan

श्रीमत्काशीविश्वाराध्यज्ञानसिंहानाधीश्वर
श्री १००८ जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी
जंगमवाडी मठ, श्रीक्षेत्र काशी (वाराणसी) यांचे
शुभाशीर्वचन


‘श्रीसिद्घान्तशिखामणितत्त्वामृत’ हा मराठी ओवीबद्घ पारायणग्रंथ काशीपीठाच्या शैवभारती शोधप्रतिष्ठानच्या शोधप्रकाशन ग्रंथमालेचे ६३ वे पुष्प म्हणून प्रकाशित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ‘श्रीसिद्घान्तशिखामणी’ हा वीरशैवांचा अत्यंत प्राचीन व प्रामाणिक असा धर्मग्रंथ आहे. वेदागमपारंगत योगिकुलचक‘वर्ती श्रीशिवयोगी शिवाचार्यांनी रेणुक-अगस्त्य यांच्या संवादरूपाने संस्कृत भाषेत या ग्रंथाची रचना केली आहे. हा अपूर्व आणि अद्वितीय असा ग्रंथ महाराष्ट्रातील भाविक भक्तांना सुबोध व्हावा यासाठी मराठी वीरशैव साहित्याचे अभ्यासक-संशोधक, चिंतक व कवी डॉ० शे० दे० पसारकर यांनी या ग्रंथावर ‘श्रीसिद्घान्तशिखामणितत्त्वामृत’ या नावाने ओवीबद्घ भाष्य लिहिले आहे.
शे० दे० पसारकर यांनी पुणे येथे जगद्गुरू विश्वाराध्य विद्यार्थि-निलयात राहून पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला आणि मराठी विषयात एम्०ए० ही पदवी प्राप्त केली. सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करीत प्रसिद्घ विचारवंत डॉ० निर्मलकुमार ङ्गडकुले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मन्मथशिवलिंग यांच्या परमरहस्य या ग्रंथाचा सर्वांगीण चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून पीएच्०डी० ही पदवी मिळवली. त्यांनी गद्य-पद्यरूपात विविध आणि विपुल साहित्यसृजन केले. श्रीमन्मथचरितामृत, श्रीरमतेरामकथामृत, अभंगसिद्घायन, श्रीसिद्घरामायण, चंद्रसावली इत्यादी काव्यग्रंथांबरोबरच कादंबरी, नाटक, स्पष्टीकरण-भाष्य, संशोधन-लेखसंग्रह; श्रीलक्ष्मणगाथा, श्रीसिद्घरामेश्वरांची वचने, श्रीमन्मथशिवलिंगकृत परमरहस्य इ० ग्रंथांची संपादने आणि महाराष्ट्रातील भाविक भक्तांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा ‘जन्म हा अखेरचा’ हा श्रीकाशीजगद्गुरूंच्या आशीर्वचनांचा अनुवादग्रंथ अशी विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्यनिर्मिती करून पसारकरांनी प्रथितयश साहित्यिक अशी स्वत:ची ओळख निर्माण केली. श्रीकाशीमहास्वामीजींच्या आग्रहपूर्वक आदेशावरून त्यांनी ‘श्रीसिद्घान्तशिखामणितत्त्वामृत’ हा ओवीबद्घ ग्रंथ सिद्घ करून मराठी वीरशैव साहित्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर, एकनाथ आदींनी गीता-भागवत ग्रंथांवर मराठी ओवीबद्घ भाष्ये लिहून मराठी भाविकांना त्यांचे रहस्य समजावून सांगण्याचा मार्ग प्रशस्त केला. वीरशैव संत श्रीमन्मथस्वामींनी सुद्घा ‘परमरहस्य’ या संस्कृत ग्रंथावर ओवीबद्घ भाष्य रचून वीरशैव सद्भक्तांना वीरशैव तत्त्वज्ञान समजावून दिले. हे सर्व पाहिल्यानंतर खूप वर्षांपासून आमच्या मनामध्ये ‘श्रीसिद्घान्तशिखामणी’ या वीरशैव धर्मग्रंथावर मराठी ओवीबद्घ भाष्य व्हावे आणि त्याचे सर्वांनी पारायण करावे, असा विचार घोळत होता. हे कार्य कोण पूर्ण करील असा विचार करीत असताना डॉ० शे० दे० पसारकर हे मराठी गद्यपद्यरचना करण्यात अत्यंत निष्णात असल्याची जाणीव होऊन त्यांनी ‘श्रीसिद्घान्तशिखामणी’वर भाष्य लिहावे अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली. आमच्या अपेक्षेला उत्स्ङ्गूर्तपणे प्रतिसाद देऊन ते सपत्निक १४ सप्टेंबर २०१२ रोजी काशीला आले. श्रीकाशीविश्वनाथ व श्रीजगद्गुरू विश्वाराध्यांचा मंगलाशीर्वाद घेऊन त्यांनी श्रीगुरूवर संपूर्ण श्रद्घा ठेवून ग्रंथरचनेला प्रारंभ केल्यामुळे अवघ्या दोन महिन्यांत, १९ नोव्हेंबर २०१२ या दिवशी स्कंदषष्ठीच्या पावन मुहूर्तावर त्यांनी ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्यांनी हे कार्य अत्यंत समर्थपणे पूर्ण केल्यामुळे केवळ आमचीच इच्छा पूर्ण झाली असे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांची ङ्गार वर्षांची इच्छा पूर्ण झाली आहे. हा ग्रंथ मुद्रित झाला असून या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका, गाव अशा पातळीवर ठिकठिकाणी ग्रंथदिंडी काढून करण्याची खूप मोठी योजना काशीपीठाने आखलेली आहे. या योजनेमध्ये सर्व भाविक भक्तांनी तनमनधनाने सेवा करून सहभागी व्हावे आणि कृतार्थता अनुभवावी.
शे० दे० पसारकर यांनी दोन महिने अखंड परिश्रम करून हे कार्य पूर्णत्वाला नेले. ‘विद्याध्ययनं तप:’ या उक्तीप्रमाणे त्यांनी तपश्चर्यारूपानेच ग्रंथलेखन केले आहे. एखादे कार्य सिद्घ होण्यासाठी कि‘या, ज्ञान व भावना यांची नितांत आवश्यकता असते. पसारकरांनी दररोज १६ तासांपेक्षा अधिक वेळ लेखनकार्य केल्यामुळे त्यांच्याठायी असलेल्या कि‘याशक्तीची पराकाष्ठा झाली आहे. यापूर्वीही अनेक वर्षे ते सदैव ज्ञानयज्ञात रत असल्यामुळे त्यांच्याकडून ‘जन्म हा अखेरचा’ यासार‘या बृहद् ग्रंथाचे लेखन झाले. अशा कार्यात सातत्याने समर्पित भावनेने गढून गेल्यामुळे त्यांच्या ज्ञानशक्तीचा पूर्णरूपाने विनियोग झाला आहे. विशेष म्हणजे भगवान शिव आणि श्रीगुरू यांच्यासमोर अकिंचन भावनेने समर्पित होऊन भावावेशात ग्रंथलेखन केल्यामुळे त्यांच्या भावशक्तीचाही कस लागला आहे. अशा प्रकारे कि‘याशक्ती, ज्ञानशक्ती व भावशक्ती यांच्या उत्कृष्ट अनुकूलतेने हा उत्कृष्ट ग्रंथ सिद्घ झाला आहे.
त्यांच्या लेखनयज्ञामध्ये त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी सौ० उषाताई यांचेही मोठे योगदान आहे. जसजसे लेखन होत गेले तसतसे संगणकीय अक्षरलेखनाचे कार्य निर्दोषपणे सौ० उषाताईंनी केले. ‘पतिरेव गुरु: स्त्रीणां’ अशी शास्त्रोक्ती आहे. उषाताईंनी गुरुरूप पतीची उत्कृष्ट सेवा केलेली पाहिल्यावर आम्हाला वाचस्पती मिश्र आणि भामती या दंपतीचे स्मरण झाले. भविष्यकाळात या दंपतीला उत्तम आरोग्य लाभून ‘इतोऽपि अतिशयेन’ वीरशैव साहित्यसेवा आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत घडो असा जगद्गुरू पंचाचार्य, श्रीकाशीविश्वनाथ आणि अन्नपूर्णा माता यांचा मंगलाशीर्वाद!
‘श्रीसिद्घान्तशिखामणी’वर संस्कृत, हिंदी, इंग्रजी, मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि रशियन अशा अनेक भाषांत गद्य पारायणग्रंथ सिद्घ झाले आहेत. आता मराठी भाविकांसाठी ओवीबद्घ स्वरूपात ‘श्रीसिद्घान्तशिखामणितत्त्वामृत’ हा पारायणग्रंथ प्रसिद्घ होत आहे. प्रत्येक वीरशैवाने इष्टलिंगपूजनानंतर या ग्रंथाचे पारायण केले पाहिजे. या ग्रंथात एकूण २१ अध्याय आहेत. प्रतिदिवशी ३ अध्याय याप्रमाणे पठण केले तर एका सप्ताहात पारायण पूर्ण होते. प्रतिदिवशी एक अध्याय वाचला तर २१ दिवसांत पारायण पूर्ण होते. या ग्रंथात १०१ उपस्थले आहेत. दररोज एका स्थलाचे पारायण केले तर १०१ दिवसांतही हे पारायण पूर्ण करता येईल. ज्याला शक्य असेल त्याला विशेष पर्वकाळी श्रद्घाभक्तीने एका दिवसातही संपूर्ण ग्रंथपारायण करता येईल. ग्रंथपारायण हे जपासमान असल्यामुळे पारायणकर्त्याला पुण्यप्राप्ती होते. त्या पुण्याईने त्यांना अपेक्षित भोग-भाग्य प्राप्त होतात. पारायणाबरोबरच स्वाध्याय आणि चिंतन केले तर शिवाद्वैतज्ञान प्राप्त होऊन लिंगांगसामरस्य मुक्ती प्राप्त होते. यांपैकी कोणत्याही विधीने, निमित्ताने श्रद्घाभक्तीने पारायण करून भाविकांनी भोग-मोक्ष प्राप्त करून घ्यावेत.
डॉ० पसारकरांनी रचलेला ओवीबद्घ ग्रंथ हा संस्कृत ‘श्रीसिद्घान्तशिखामणी’वरील मराठी भाष्य तर आहेच, परंतु त्याचबरोबर अध्याय २ ते २१ पर्यंत प्रारंभी कृतयुगापासून ते कलियुगापर्यंत होऊन गेलेल्या सर्व पंचाचार्यांना त्यांनी क‘मश: वंदन केलेले आहे. त्यामुळे भाविकांना सहजपणे जगद्गुरू पंचाचार्यांच्या सर्व नामांचे स्मरण व नमन घडते. अध्याय ५ ते अध्याय २० पर्यंत प्रारंभीच्या ओव्यांतून त्यांनी भगवान शिवाची अष्टोत्तरशत नामे गुंङ्गून शिवाला नमस्कार केला आहे. त्यामुळे पारायणकर्त्याला शिव-अष्टोत्तरशतनामाचा सहजपणे जप घडतो. २१ व्या अध्यायाच्या प्रारंभी त्यांनी लिंगाष्टकातील शिवस्तुतिपर विशेषणांचा उपयोग केल्यामुळे पारायणकर्त्याला लिंगाष्टक म्हटल्याचेही पुण्य लाभते. याशिवाय या ग्रंथात पंचाचार्यांची उत्पत्ती, त्यांची चतुर्युगांतील नावे, उत्पत्तिस्थाने, सूत्र, गोत्र यांचे विवेचन करून अष्टावरण व पंचाचार यांचेही विवरण केलेले आहे. इष्टलिंग ङ्गुटले किंवा हरवले तर भक्ताने त्यावेळी कोणते प्रायश्चित्त घ्यावे यासंबंधीची माहितीदेखील ‘कारणागमा’च्या आधारे या ग्रंथात आली आहे. ‘श्रीसिद्घान्तशिखामणी’तील तत्त्वज्ञानाबरोबरच ही सर्व माहिती योग्य ठिकाणी गुंङ्गल्यामुळे हा ग्रंथ सर्वांगसुंदर झाला असून याच्या पठण-पारायणामुळे मराठी भाविकांना विशेष ङ्गलप्राप्ती होणार आहे. मठाच्या कार्यात सेवारत असलेले व ग्रंथमुद्रणकार्यात सहभागी असलेले श्रीमती नलिनी गंगाधर चिरमे, शैवभारती शोधप्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ० जी० सी० केंडदमठ, संस्कृत श्लोकांची अक्षरजुळणी करणारे चिदानंद ओ० हिरेमठ (कसगी), मित्तल ऑङ्गसेटचे जोहरी व ज्यांचे या कार्याला हातभार लागले त्या सर्व सद्भक्तांना मंगल आशीर्वाद.
या पारायणग्रंथासाठी श्रीमद् रंभापुरी, श्रीमद् उज्जयिनी व श्रीशैल जगद्गुरूंनी आपले मंगलाशीर्वाद दिल्याबद्दल त्यांच्या श्रीचरणी अनंत नमस्कार.
॥ ॐ शांति: शांति: शांति:॥
३ डिसेंबर २०१२