Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 1

अध्याय पहिला

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीजगद्गुरु पंचाचार्येभ्यो नमः । श्रीउमामहेश्वराभ्यां नमः। श्रीमन्मथस्वामिने नमः ॥ ॐ नमो जी एकदंता । गणनायका शिवसुता । प्रज्ञा-प्रतिभेचा तू दाता । वक्रतुंडा गणपती ॥ १ ॥ आरंभिले ग्रंथलेखन । ते कृपेने करावे पूर्ण । अल्पमती मी विद्याहीन । म्हणूनि तुला वंदितो ॥ २ ॥ सारस्वतांची स्फूर्तिझरी । वीणावादिनी वागीश्वरी । विश्वमोहिनी तूच खरी । तुला माये वंदितो ॥ ३ ॥ सुखदु:खांच्या संसारगाथा । आदिकालापासून त्याच सर्वथा । परि तुझ्या कृपेने कथा-। रूप धारण करिती गे ॥ ४ ॥ काव्य महाकाव्य नाटक । अशी रूपे अनेकानेक । त्यांत तुझे दिसे कौतुक । रसिक-सारस्वतांना ॥ ५ ॥ ग्रंथरचनेसाठी म्हणून । तुझे मागतो कृपादान । सिद्घीस…

Read more: Chapter 1