Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 2

अध्याय दुसरा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु एकाक्षर शिवाचार्याय नमः ॥ सच्चिदानंद परशिवा । जाणूनि घेई माझ्या भावा । देवा पूर्णत्वासी न्यावा । तत्त्वप्रकाशक ग्रंथ हा ॥ १ ॥ जे वीरशैव मार्ग भुलले । आपुल्या स्वत्वास विसरले । शिवभक्तीस विन्मुख झाले । अन्य पंथी प्रवर्तूनी ॥ २ ॥ उणा नसता स्वधर्म । तरी आचरिती परधर्म । त्यांना दाखविणे मर्म । विवरूनि या ग्रंथात ॥ ३ ॥ तो समृद्घ वीरशैवविचार । बिंबवावा लोकमनावर । यासाठी मांडिला जागर । या ग्रंथाच्या रचनेचा ॥ ४ ॥ म्हणूनि शिवा साह्य करी । प्रमादालस्य विघ्ने वारी । प्रकटूनि मम अंतरी । निमित्त मला करावे ॥ ५ ॥ मागील अध्यायी झाले कथन । ग्रंथकाराचे वंशवर्णन । श्रीसिद्घान्तशिखामणीचे महिमान…

Read more: Chapter 2