Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 3

अध्याय तिसरा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु द्य्वक्षर शिवाचार्याय नमः  ॥  जय जय शिवा पंचानना । भक्त-पाशविमोचना । कलिमलदहना उमारमणा । कामदहना चिद्रूपा  ॥ १ ॥  तुझे नाम आशुतोष । अल्पभक्तीने तोषतोस । हा भक्तमनीचा विश्वास । ठरवी साथर्र् शंकरा  ॥ २ ॥  कोणी वाहता पुष्प- ङ्गळा । त्याने तुष्टतोसी जाश्वनिळा । कोणी वाहता बिल्वदळा । त्यास नेतोस कैलासी  ॥ ३ ॥  मार्कंडेयाचे आयुष्य अल्प । त्याला दिले चौदा कल्प । संतोषे भक्तीने स्वल्प । ऐसा दुजा देव कोण?  ॥ ४ ॥  आता पुरवी माझी आस । सामर्थ्य देई रचनेस । पांगळ्याला लंघवितोस । गिरिशिखरे उत्तुंग  ॥ ५ ॥  माझे मागणे त्यापुढे । परशिवा आहेच केवढे? । तुझा दृष्टिक्षेप पडे । तरी…

Read more: Chapter 3