Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 4

अध्याय चौथा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु त्र्यक्षर शिवाचार्याय नमः  ॥  जो सर्वदा शुभंकर । नमू स्वसंवेद्य शंकर । ज्याच्याठायी निरंतर । नांदे विरति-वैभव  ॥ १ ॥  जयजयाजी सदाशिवा । पंचमुखा महादेवा । सद्योजाता वामदेवा । अघोरा तत्पुरुषा ईशाना  ॥ २ ॥  तव कृपेने लेखणी झरे । उमटती कागदावरी अक्षरे । ओवी-ओवीतून अवतरे । तत्त्वज्ञान-साहित्य  ॥ ३ ॥  नसता व्यासंग अभ्यास । प्रवर्तलो मी लेखनास । तू पाठीशी हा विश्वास । दृढ आहे मानसी  ॥ ४ ॥  तुझे देणे जगावेगळे । पुरविशी सर्वांचे सर्व लळे । माझे ग‘ंथरचनेचे डोहाळे । तेही पुरवी दयाळा  ॥ ५ ॥  श्रोतेहो आता पुढे ऐका । शिवे आज्ञा केली रेणुका । त्यानुसार ते भूलोका । आले अवतीर्ण…

Read more: Chapter 4