Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 12

अध्याय बारावा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु रेणुकाचार्याय नमः  ॥  ॐ शिवाय नम: सोमाय । पंचवक्त्राय नमः सदाशिवाय । विश्वेश्वराय नमः वीरभद्राय । गणनाथाय नमः प्रजापतये  ॥ १ ॥  तुझ्यामुळे विश्व     स्पंदते । तुझ्या तेजाने प्रकाशते । तुझ्या आनंदे तुष्टते । तू विश्वाशी एकरूप  ॥ २ ॥  तुझ्या कृपेने ग‘ंथलेखन । अर्धे-अधिक झाले पूर्ण । उर्वरित तेही करवून । घेई माझ्याहातूनी  ॥ ३ ॥  असो भक्तस्थलांतर्गत । भक्त-माहेश्वर-प्रसादी स्थले समस्त । विवरिली आतापर्यंत । कथितो प्राणलिंगि-स्थल  ॥ ४ ॥  कि‘या आणि ज्ञान । यांचा समन्वय साधून । घ्यावे लागते करून । प्राप्त शिव-    सामरस्य  ॥ ५ ॥  जर पंख असतील दोन । तरीच शक्य आकाशगमन । अन्यथा भूमीवरी राहून । रांगावेचि लागेल…

Read more: Chapter 12