Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 13

अध्याय तेरावा

 श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु दारुक शिवाचार्याय नमः  ॥  ॐ शिवाय नमः दुर्धर्षाय । अनघाय नमः गिरीशाय । गिरिशाय नमः भुजंगभूषणाय । भर्गाय नमः हिरण्यरेतसे  ॥ १ ॥  उत्पत्ती स्थिती आणि लय । यांचा साक्षी तू स्वयमेव । अवघे ब‘ह्मांड शिवमय । तू निमित्तोपादान जगताचे  ॥ २ ॥  शक्तीचे करूनि निमित्त । तूचि धरिशी रूपे अनंत । सकल चराचरा चाळवीत । परि सर्वांवेगळा तू  ॥ ३ ॥  जळ भरलेले सागरी । त्यावरी नाचती लहरी । लहरी भिन्न भासती परी । त्या अभिन्न सागरासी  ॥ ४ ॥  सिंधू आणि बिंदू । यांचा जैसा संबंधू । तैसा तुझा दीनबंधू । साच संबंधू जीवांसी  ॥ ५ ॥  असो मी प्रवर्तलो येथ । विवराया…

Read more: Chapter 13