Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 14

अध्याय चौदावा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु घंटाकर्ण शिवाचार्याय नमः  ॥  ॐ शिवाय नमः गिरिधन्वने । गिरिप्रियाय नमः जगद्रूपिणे । कृत्तिकावाससे नमः अनेकात्मने । पुरारातये नमः भगवते  ॥ १ ॥  तूचि श्रीगुरुरूप धरून । भक्तांसी देतोसी शिवज्ञान । करिसी मुक्त संसारातून । ऐसा भवभयमोचक      तू  ॥ २ ॥  तुझ्या रूपाहूनि अधिक । गुरुरूपाचे माहात्म्य देख । तोचि करूनि देई ओळख । तुझ्या शिवरूपाची  ॥ ३ ॥  तोच दीक्षा देतो बोधितो । हृदय भरता अश्रू पुसतो । तोच भक्तासी हृदयी     धरितो । संकटी दावितो मार्गही  ॥ ४ ॥  म्हणूनि श्रीगुरुरूपी शंकरा । मजला मार्गदर्शन करा । ग‘ंथरचना-उद्योग सारा । न्यावा तुम्ही सिद्घीसी  ॥ ५ ॥  असो श्रोते सावध चित्ते । सादर व्हावे श्रवणी…

Read more: Chapter 14