Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 19

अध्याय एकोणिसावा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु एकोरामाराध्याय नमः  ॥  ॐ शिवाय नमः हराय । भगनेत्रहृते नमः अव्यक्ताय । सहस्राक्षाय नमः अपवर्गाय । अनंताय नमः सहस्रपदे  ॥ १ ॥  शिवा शंकरा मायबापा । तुझी होता पूर्ण कृपा । मोक्षमार्ग होय सोपा । प्राकृत अज्ञ जनांसी  ॥ २ ॥  कोण कोठली भिल्लीण । तिने वाहता बेलपान । तिला नेले उद्घरून । शिवलोकी कृपाळा  ॥ ३ ॥  अल्पभक्तीने संतुष्टे । ऐसा कोणता देव कोठे? । जप तप साधन मोठे । तुला न लागे काहीच  ॥ ४ ॥  तुझ्या कृपेने लेखणीत । सामर्थ्य भरले किंचित । चाललो अक्षर-बीजे पेरीत । शुभ‘ कृषीत कागदाच्या  ॥ ५ ॥  भक्तहृदयीची भाव-ओल । लाभता हे क्षेत्र पिकेल । भक्तिपीक…

Read more: Chapter 19