Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 7

अध्याय सातवा

श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु एकवक्त्र शिवाचार्याय नमः  ॥  ॐ शिवाय नमः श्रीकंठाय । भक्तवत्सलाय नमः भवाय । शर्वाय नमः त्रिलोकेशाय । शितिकंठाय नमः कपालिने  ॥ १ ॥  मागील अध्यायी झाले कथन । गुरुकारुण्य लिंगधारण । या स्थलांचे केले विवरण । जगद्गुरू रेणुकाचार्यांनी  ॥ २ ॥  कंठी रुळे इष्टलिंग । शुभ‘ भस्मचर्चित सर्वांग । रुद्राक्षभूषित अशा अव्यंग । वीरशैवास पाहता  ॥ ३ ॥  मनी आनंदा ये भरती । झरती दोन्ही नेत्रपाती । भासे उभा आहे पुढती । शिवगण प्रत्यक्ष  ॥ ४ ॥  देहावरील धर्मचिन्ह । हृदयी घडवी परिवर्तन । चिन्ह बाह्य परिणाम पण । अंतरंगी होत असे  ॥ ५ ॥  जरी दूध करणे उष्ण । तरी ते पात्रात ठेवून ।…

Read more: Chapter 7